________________
६५२ : आराधना-कथाकोष टीका:- शतानुशत दुर्लभता । नरदेहे न ये मागुता । भव्यः धावि दृष्टांत कथा । किंचित् श्रोता श्रवण करा ।।१७९।। चौयांशी लक्ष योनीत । जीवा दुर्लभ देह प्राप्त । गंगा ओघ अब्धि मिळत । पुनः मागुत येइना तो ॥१८०॥ कळि वर्षारूतु आकासी । गंगाजळ मिळे समुद्रासी । काळगती नरदेहासी । येता धर्मासि भेट नोव्हे ॥१८१।। कुकुळी जन्मला जो प्रानी । कुधर्म वसे त्याचे मनी । कुदेव कुशास्त्र श्रवणी । सुपुण्य स्वप्नी न मिळे त्या ।।१८२।। तेथे नृजन्म व्यर्थ गेला । पुनः भोगितो चौन्यांशीला ।
आला गेला तो गेला आला । ज्ञानी ओळखिला पाहिजे ।।१८३।। यत् प्रकार दहा दृष्टान्त । जानोनी करा आत्महित । देवगुरू शरणांगत । मोक्षपंथ जावयासी ॥१८४।।
इति गुरू रत्नचंद्रकीर्ती कथाकोश तुर्य आराधना दहा दृष्टांत कथा विरचिते प्रसंग ४७ संपूर्ण शुभं भवतु । कल्याणमस्तु।
Jain Education International
For Private & Personal Use Only
www.jainelibrary.org