________________
प्रसंग शेहेचाळीसावा : ६३३ तत् पुत्र जन्मो जयगुनी । मदनावली त्याची भगिनी । रूपसौंदयं गुणाची खानी । नसे मेदनी अनुपम ॥१७९॥ माता पिता विचार करिती । कन्येस वर न दिसे क्षिती। पाचारोनी जोतिषा निमित्ती । वर पुसती कन्यकेचा ॥१८०॥ तारा चंद्रबळ विचारिती । कन्येसी वर षट्खंडपति । स्त्रीरत्न चक्रवर्तीस प्राप्ति । अन्य क्षिती अन्यथा नसे ॥१८१॥ रायवचन त्रिधा सत्य । राव म्हणे कन्या पुण्यवंत । मग तो राहिला निश्चित । मार्ग लक्षित जामाताचा ।।१८२।। तेव्हा कवने एके दिवसी । चक्षु देखिले शुभ्र रोमासी । राज्य देवोनिया पुत्रासी । बांधला शीषी राजपट्ट ।।१८३।। वैराग्य उद्भव जाल त्यासी । जाउनिया सद्गुरूपासी । विनय करोन घे दीक्षेसी । जाला तापसी वनगुंफेत ॥१८४।। मदनावली रूपवंती। मात फाकली देशाप्रती । पृथ्वीराजे पृच्छा करिती । तयासी न देती जन्मोजय ॥१८५।। तथा उंड नाम देशात । कळावंती नगरी तयात । तेथे कळांकळ नामा उन्नत । जैसा मदोन्मत्त दशानन ॥१८६।। पाठविले चतुर नर । न देता जाला क्रोधाय नेत्र । सामंत राजे दळभार । ठाकोन चंपापुर वेष्टिले ।।१८७।। मोहनी कर्म तो बळवंत । नित्य विषयी युद्ध करीत । जन्मोजय सात्विक सत्य । क्षमावंत षट्कायजीवा ।।१८८॥ क्रोध-मान-माया-लोभ चारी । सात्विक जीवाचे हे वैरी । ग्राम घेतला बळात्कारी । आलि हारी सप्तव्यसना ।।१८९।। सुरूंग होता वना अतौती। मायकन्या दोघि निघती। राजा तापसिया सांगती । स्थिरावती त्याच वनात ।।१९०॥
Jain Education International
For Private & Personal Use Only
www.jainelibrary.org