________________
४० : आराधना-कथाकोष
बत्तीस सहस्र विद्याधर । नृप सेविति चक्रधर । कीर्ति व्यापिलि पृथ्वीवर । पुण्य थोर पूर्वकृत ॥३३॥ नानाविधसंपदासहित । चक्रवर्ति राज्य करित । जिनधर्ममार्गि असे रत । स्वप्रजा पालित न्यायमार्गे ॥३४॥ प्राग्भवपुण्य करोन । सर्व वल्लभास हित जान । भोग भोगिति नित्य नूतन । संवत्सरात क्षणतुल्य मानिति ॥३५॥ कवने येकिय दिवसि । सौधर्मेंद्र स्वकिय सदसि । बैसला असे मनोल्लासि । धर्मचर्चासी करितसे ॥३६॥ मध्यलोकामाजि सार । धर्मवंत वसति नर । स्वरूपगुणाचे भांडार । सौख्यप्रचुर भोगिति ॥३७॥ इंद्र स्वमुखे करोन । विशेस करि स्वरूपवर्णन । तदा यक देव करी प्रश्न । देवा या प्रमाण कोन्ही असे ॥३८॥ इंद्र ऐकोनिया सुरोक्ति । म्हने सनत्कुमार चक्रवति । तस्माद्दधिक रूप असति । पश्यताक्ष तृप्ति न पावति ॥३९॥ रत्नचूलमणिमालि सुर । देवेंद्रवाक्य ऐकोनि सार । चक्रवर्तिचे रूप सुंदर । पाहावया सत्वर पावले ॥४०॥ गुप्त राहोनिया गगनि । रहित वस्त्राभूषणाहूनि । चक्रवर्तिमज्जनस्थानि । स्वरूप नयनि पाहिले ॥४१॥ परस्पर वदति वाचे । वस्त्रभूषणाविन साचे । अद्भुतरूप दिसे याचे । नसे इंद्राचे रूप ऐसे ॥४२॥ महदाश्चर्य मानोनि चित्ति । त्वरे उतरोनिया क्षिति । वदति द्वारपालाप्रति । निवेदन भूपतिलागि करी ॥४३॥ त्वत्स्वरूप पाहाव्याकारण । सुरयुग्म आले स्वर्गाहून । त्वा सांगावे तयासि जाऊन । तदाज्ञा घेऊन यावे त्वरे ॥४४॥
Jain Education International
For Private & Personal Use Only
www.jainelibrary.org