________________
प्रसंग पंचेचाळीसावा : ६११ कथा अठ्यांशी संपूर्ण । पुढील कथे मन लावण । श्रवणे ज्ञान आनि पुण्य । तपोत्पन्न भाविक श्रोता ।।११९।। श्लोक-सर्व-देवेंद्रनागेंद्र नरेंद्राद्यैः समचितं । नत्वा श्रीजिनं प्रवक्षेहं विनयाख्यानकं शुभं ॥१२०।। वत्स देश असे विख्यात । कौशंबी नगरी असे तेथ । राजा भूधनसेनाख्यात । विष्णुभक्त मिथ्यात बुधी ।।१२१।। धनश्री स्त्रीरूप अत्यंत । रमण रमणी उपमातीत । कामिनी जिनपदसम्यक्त्व । भ्रमरवत् श्रावकीन ॥१२१॥ त्याच नगरी एक ब्राह्मण । नाम सुप्रतिष्ठ अभिधान । भागवत क्रिया निपुण । नित्यभोजन राजा दे त्यासी ॥१२३।। कुतप कुविद्या आराधी । जलस्तंभन मंत्र साधी । प्रपंचेन जनास भोंदी । यमुनेमधी पलंकासनी ॥१२४।। जप करी जळांतराळी । जन पाहति नेत्रकमळी । आश्चर्य करिती हृदमेळि । मूढामूढ नव्हाळी सत्येची ।।१२५।। अथ श्री विजयार्डावरी । दक्षिण श्रेणिलाख्यापुरी। चक्ररथ राजनीती बरी । सहपरिवारी नांदतु ।।१२६।। राजा विद्युत्प्रभ विख्यात । श्रावकधर्मी तो मंडित । राणी विद्युत्वेगा मिथ्यात । विष्णुभक्त ते मोहरी ।।१२७।। एकदा तो विद्याधर । कौशांबी आला परिवार । माघमासाच माहात्म्य थोर । यमुना नीर स्नानक्रिया ।।१२८।। तेथे पाहिला कुतपस्वी । जळामध्ये तो ध्यानी ऋषी। विद्युत् प्रभा पाहोनी त्यासी । प्रशंसा रायासी सांगत ।।१२९॥ राजा म्हणे हे मूढमते । कुविद्येचे बळ ईयात । जना दाखवी चमत्कारार्थ । उदरनिमित्त पोटार्थी ॥१३०।।
Jain Education International
For Private & Personal Use Only
www.jainelibrary.org