________________
५६२ : आराधना-कथाकोष ते ऐकोन आश्चर्य करी । कोतवाल तुझी मैत्री। कोठे घडली सांग वक्त्री । गुरूवैखरी दृढ तुज ॥२१॥ आहेर देश मनोहर । बेनातट ग्राम सुंदर । बेनानदी निर्मळ नीर । राज्यधर जितशत्रु तो ॥२२॥ जयावती सुंदर सती । तय कुसी पुत्रोत्पत्ती । विद्युत्चर नाम ठेविती । रंजविती मज नृपाळा ॥२३॥ तग्रामात एक तराळ । यमदंड तयाचा बाळ । पढत होता एकसाळे । उपाध्याय कुशल शीकवी ॥२४॥ चौरांग विद्या मी शिकलो । शास्त्रयुक्त दोघ पढलो । ज्ञानकळा गुणज्ञ जालो । प्रतिज्ञा बोललो ते ऐका ॥२५॥ तुम्ही आम्हीच दोघे जन । चोरी करिता ग्रामजन । त्वा करावे मम रक्षण । अभयदान देईन मी ॥२६॥ ऐसे वचन परस्पर । स्व स्व गृही जाहलो स्थिर । मम पिता गुणज्ञ चतुर । राज्यभार मज दिधला ॥२७॥ गुणकीति श्रीगुरूपासी । दीक्षा घेतली पापनासी । भयभीत यमफासी । राजे फासी मज दिधले ॥२८॥ एके दिनी प्रतिज्ञास्तव । येन जाहले तुमचे गान । यमदंडा परत्भाव । सोसिले घाव केल्या कर्माचे ॥२९॥ हार चोरला राया तुमचा । शब्द फिटला वो अमचा । सांभाळ करावा सर्वाचा । यमदंडाचा प्रतिपाळ ॥३०॥ ऐसे वदोनी विद्युत्चर । अनित्य पाहोनी संसार । येवोनीया तो स्वनगर । वैराग्य आंतरे विरक्त ॥३१॥ राज्य दिधले स्वपुत्रासी । पूजाविधी जिनदेवासी । विनंती करोनी गुरूसी । दीक्षा मजसी द्यावी स्वामी ॥३२॥
Jain Education International
For Private & Personal Use Only
www.jainelibrary.org