________________
३२ : आराधना कथाकोष
देवि वदे नित्य नूतन । न जाने पूर्विचे भाषण । जैसे शोनिता प्रवाह जान । माधे फिरोन जायेचि ना ॥२०१॥ तदा तो जैनपंडित भला । महाक्रोधे खवळला । अंत:पट फाडोनि टाकिला । घट फोडिला पदधाते ॥२०२।। मानभंग पावोनि सूरि । पळोनिया गेलि दूरि । बौध अपमान पावोनि थोरि । देशांतरि गेले त्वरा ॥२०३।। तदा मदनसुंदरी राज्ञी। थोर हर्ष पावलि मनि । अकलंक देवाचे चरणि । केला उठोनि नमस्कार ।।२०४॥ मग करिति झालि स्तवन । म्हणे तू धन्य पुण्यपावन । मिथ्यामत विध्वंसून । जिनशासन रक्षिले ॥२०५॥ स्वामि आता त्वा त्वरित । पूर्ण करावा मन्मन हेत । त्वा आपुले निजहस्त । करावा रथमहोत्सव ॥२०६॥ राज्ञिवाक्य ऐकोनि कणि । अकलंक वदे मेघगर्जनि । अहो संघश्री अभिमानी । प्रथमान्हि म्या जिंकिला ||२०७॥ हे बोध मिळोनिया सर्वे । देवि स्थापोनि कपटभावे । वाद करविला मजसवे । यासि का म्हणावे महाज्ञानी ॥२०८॥ चंद्रा आड येता मेघपटल । खद्योत मिळोनि सकल । स्वतेज दाखवोनि प्रबल । निशातम तुंबळ का नासिति ॥२०९॥ ऐक हे हे मदन मुंदरि । चित्ति बोधाचे भय न धरि । श्रीसंघ मिळवोनि सत्वरि । रथोत्सव करि महदानंदे ॥२१०॥ म्या वादे जिंकिले बौधात । प्रगट कराया जिनमत । स्वज्ञानाचा कराया उद्योत । अहंकार चित्तात क्वचिन्नसे ॥२११॥ म्या संघश्री वंदकासवे । वाद न केला द्वेशभावे । जिनभाक्तिकासि सौख्य व्हावे । या कारूनाभावे जानिजे ॥२१२॥
For Private & Personal Use Only
Jain Education International
www.jainelibrary.org