________________
३० : आराधना कथाकोष
अगा संघीय भक्ता । तुवा न करावी क्वचिच्चिता । मजसवे वाद करिता । नसे कोन्हि ज्ञाता धरातलि ॥ १७७॥ एकोनि देवतावचन | पंच उषःकालि उठोन ।
राजमंदिर जाऊन । नृपाकारन वदतवे ॥ १७८॥
राया मद्वाक्य आइक । त्यासवे वाद करीन सुख । परंतु कौनाचे न पाहावे मुख । ऐसी भीख द्यावी मज || १७९|| ऐसे पुसोनि नृपात | अंतःपट बांधोनि त्वरित । संघश्री बैसोनिया आत । देवि कुंभात अवतारिलि ॥ १८० ॥ कपटि जनजनामधि । विच्छिति स्वकिय कार्यसिद्धि | शतमूर्खासि ज्ञानवृद्धि । कैचि नवनिधि पापिष्टगृहि ॥ १८९ ॥ तदा अकलंक देवा कारन । रायाने पाठवोनि यान । वादस्थानी आले घेऊन । श्रीसंघ मिळून जैनधर्म ॥ १८२ ॥ तदा देवि वदे क्षणोपन्यास । स्वमत करी प्रकास । अकलंक स्वज्ञान प्रकाश | टाकि तत् न्यास खंडोनिया ॥ १८३॥
1
पुन: पुन: स्वपक्षपात । देवि स्थापे एकांतमत । अनेकांतमते करोनि त्यात । टाकिती त्वरित उच्चाटुनि ॥ १८४ ॥ देवि स्वमत समर्थ करि । ते स्वज्ञाने करोनि थोरी । क्षणामाजि निसिद्ध करि । निशांधकारि भानू यथा ॥ १८५ ॥ ऐसा वाद दोघे जन । षड्मासपर्यन्त केला जान । तदाकलंक देवाचे मन । चिंता करोन ग्रस्त झाले ॥ १८६॥ म्हने हा संघश्री मजपुढे । किमात्र असे बापुडे । षण्मास वाद केले गाढे । हे महत्साकडे मज दिसे || १८७ || ऐसि चिंता स्वमानसि । अकलंक देव करिता निसि । तचिंता दूर करायासि । चक्रेश्वरि त्यासि वदे येऊनि ॥ १८८ ॥
Jain Education International
For Private & Personal Use Only
www.jainelibrary.org