________________
प्रसंग अडतीसावा । ५०७
कित्येक दिवसपर्यंत । चक्रवर्ती राज्य करीत । सूर विचारी मनात । मणिकेत स्वर्ग स्वर्गेन्द्र देव ।।१११॥ येवोनी अयोध्यानगरी । चारणमुनी रूप धरी। बैसोन चैत्यालयाभीतरी । उपदेश करी रायासी ॥११२॥ दीक्षा संयम जे घेतात । स्वर्ग मोक्ष तयासी प्राप्त । सगर चक्री विस्मय मनात । पाहोनी मुनीत पृच्छा करी ॥११३॥ अहो स्वामी रूपतारुण्य । दीक्षा घ्यावया किंकारण । मुनिराजानी ते ऐकोन । प्रतिवचन मधुरगिरा ॥११४॥ यौवन वनिता संता । स्थिर न राहे हो समर्था । संसाराब्धि घोर चिंता । मम चित्तासी सहावेना ॥११५॥ म्हणोनिया तरणोपाय । दीक्षाजहाज अब्धि होय । याने संसारात उपाय । जिवान सोय पहात जावी ॥११६।। इत्यादिक त्या शुभज्ञान । संबोधिता न फिरे मन । देव जाला क्षीदक्षीण । स्वर्गभुवन तो गेला ॥११७॥ अर्थकदा चक्रवर्ती । सिंहासनी स्वस्थ चित्ती । नेक राजे भेटिसी येताती । ऐका भूपती मुनिवाक्य ।।११८॥ पुत्र संतत आनि संपत । पूर्वदत्ते सर्व प्राप्त । जीवा असाध्य तो मोक्षपंथ । दीक्षाविरहित न साधे ॥११९॥ त्याविना जीव भटकती । नाना उपाय करिताती । वांजवृक्षा फळ उत्पत्ती । नोव्हे कल्पांती पुण्यविना ॥१२०॥ ते ऐकोनिया चक्रधर । मधुर वचन प्रियंकर । मम पुत्र साठसहस्र । अंतःपुर सहस्र छान्नव ॥१२१॥ षट्खंड पृथ्वी ऐश्वर्य । बत्तीस हजार नृपवर्य । नित्य सेविताती पाय । पाहोन हृदय संतुष्ट ॥१२२॥
For Private & Personal Use Only
Jain Education International
www.jainelibrary.org