________________
४८२ ! आराधना कथाकोष चेपून टाकी नासिकासी । विद्रूप केले ते बाळेसी । दुःख जाल देवकीमातेसी । समजावी कन्येसी तेधवा ॥१८७॥ गोकुळी वाढे कृष्णनाथ । बाळक्रीडा खेळ खेळत । येरीकडे मथुरा नगरात । उल्कापात होत दिवसा ॥१८८॥ तदा पाचारिला सकुनी । विपरीत कायद्या सांगोनी। वैरी वाढे गोकुळभुवनी । तुमची हानी दिसताहे ॥१९८॥ ते ऐकता कंसरायान । तया जाल जातिस्मरण । पूर्वभवी देवता प्रसन्न । केले आह्वान त्या देवताचे ॥१९०॥ स्या येवोन त्वरित तेथ । कंसराव सांगे तयात । वैरी वाढतो गोकुळात । वधावे त्यात प्रयत्नान ॥१९१॥ तत् शृत्वा देवता कर्ण । पूतना वेश धरिला तीन । विषदुग्ध भरोन थन । केले प्रयाण गोकुळासी ॥१९२।। यशोदापुत्र वासुदेव । प्रथम देवता करी माव । पूतना सोखिली कृष्णदेव । पळाली भय धरोनिया ॥१९३॥ द्वितीया देवी कागासुर । पक्ष लुंचिता पळाली दूर । बिमळार्जुवि वदे क्रूर । उखळ प्रहर पळविले ॥१९४।। तुर्य देवी विद्यानिजिता । शकटवेषधारी क्रूरता। लत्ताप्रहार गाडा मोडिता । होवोनी लज्जित पळाली ।।१९५।। पंचमी देवी मावळ भट । पीढे दान जाहाला कूट । श्रेष्ठी अश्वदेवता नीट । पीटिता कष्ट पळाली ते ॥१९६॥ मेघविद्या देवी तनय । मुसळधारा सप्तदिन । गोवर्धन धरिला त्यान । लज्जायमान सप्तमी ते ॥१९७।। काळिया नाग आठवी देवता । यमुना डोही हारि हंता । मुरलीधर जयवंता । कंसासी वार्ता समजली ते ।।१९८।।
For Private & Personal Use Only
Jain Education International
www.jainelibrary.org