________________
प्रसंग छत्तीसावा
श्री वीतरागाय नमः
नत्त्वाष्टादशभिदोनिर्मुक्तं जिननायकं । वशिष्ठतापस्योच्चैश्चरित्रं रचयाम्यहं ॥१॥ टीका-मथुरा नगरी विख्यात । उग्रसेन राजा पुण्यवंत । षड्गुण भार्या गुणवंत । प्रीतीवंत रेवती राज्ञी ।।२।। जिनदत्त श्रेष्ठी त्या नगरी । जिनपदी भ्रमरापरी । संतत संपत पूर्ण घरी । तदासी मंदीरी प्रियंगा ॥३॥ नदी यमुना एके दिवशी । वशिष्ठ मुनी आले तापसी। स्नानानंतरे तडागासी । पंचाग्नीसी साधताती ॥४॥ जग मूढ त्रय जे जन । लघु प्रोढ मेळा अज्ञान । तयाचि भावभक्ती करोन । प्रशंसावचन करिताती ॥५॥ कोन्ही करिताती पूजन । कित्येक करिताती नमन । त्यासी करिती प्रदक्षण । षड्रस पक्वान्न ठेविताती ॥६॥ जिनदत्त श्रेष्ठीची दासी । प्रियंगु नामे गुणराशी । सखीसहित तडागासी । कुतपस्वी देखिला तियेन ।।७।।
Jain Education International
For Private & Personal Use Only
www.jainelibrary.org