________________
प्रसंग चवतीसावा । ४४९
सप्तव्यसनी श्रेष्टीपुत्र । धन संग्रहिले सर्वत । घट भरोनि पूर्णवगत्र | स्वामी सन्मुख धाले ठेवि ॥ ६६ ॥ पुरान नित्य ऐकताती। संतोष होतात सम्यक्ती । तीन रत्न हृदयी धरिती । क्रिया पाळिति तिरोपन ||६७ || श्रेष्टिपुत्र कुबेरदत्त । पिताधन ठेवि कउत । पिताचे नेत्र धरि धृत । पापपंडित व्यसनी ते ॥ ६८ ॥ जानोनि नेत्राचि त्या खुण । असनासमि पखानोन । स्वामी बैसले ध्यान धरोन । नले काढोन धनघटा ॥ ६९॥ श्लोक - मुनिविशुद्ध चारित्रो जानं पश्यन्नपि ध्रुव । तदा मध्यस्थभावेन संस्थितो मेरुवत्तरां ॥ ७० ॥ सर्वत्र भावरि करिती । नवविधा पुण्य जोडिति । धर्मद्रव्य मेळविती । भावना भाविती पुण्यवंत ॥ ७१ ॥ पूर्ण योग तुर्यमास जाला । समस्तानि ममोस्तु केला । आशिर्वाद सर्वा दिधला । श्रेष्टी गेला चैत्यालयात ।।७२।
श्रेष्टि कुंभ पाहे नयनी । रिक्त जागा तेथे देखोनि । हृदयी भयाभीत मनि । विचित्र करनी कर्माची ॥७३॥ अरे देवा काय जाले । संसार जिवित्व माझे नेले । म्या मुनि देखता ठेविले । नाहि देखिले दुसन्याने ॥७४ || ऐसे चिंतोनि हृदयात । त्वरा गेला तो स्वामि जेथ । महाविनये करि तेथ । मम मनोरथ पूर्ण करा ॥ ७५ ॥ माझे मन स्थिर करोन । त्वरित यावे या मार्गान । यति समजले अंत:कर्ण । मेरुसमान धैर्यवंत ॥ ७६ ॥ घेवोन आत्मा चैत्यालयात । गादि बैसविले महंत । सर्वाहिनी केला नमोस्त । मम मन स्वस्थ कथा सांगा ||७७ ||
1
Jain Education International
For Private & Personal Use Only
www.jainelibrary.org