________________
प्रसंग चवतीसावा : ४४७
तो शिवशर्मा मम पिता । कमळावती माझी जनिता । अष्टपुत्र उपरांता । मीच दुहिता रूपवंती ॥४३॥ मम जेष्टा नामाभिधान । विराजित सौभाग्यमान । तुकार देता क्रोधोत्पन्न । भयभीत मन सर्वाचे ॥४४॥ राजमान्य मम पिता । पूर्वपुण्य संतत संपता । एकदा राज्ये सभातौता । गेले मी पितासमागमे ॥४५॥ राजा वदे तू वो कवन । तुकार देता क्रोधोत्पन्न । मे तुकारि नामाभिधान । राज्यवचन अढळ पै ॥४६॥ तुकार माझ्यान सोसवेना । नोवरा माते मिळेचिना । सोमश्रमा ज्वारि ब्राम्हण । कन्यादाना गृहजामात ॥४७॥ कित्येक दिन उज्जनीत । सुखभोग तुकारसहित । एके दिनि मम प्रिय एकांत । नाटक नृत्य पाहू गेले ॥४८॥ निशि झाले दोन प्रहर । क्रोधोत्पन्न मम आंतर। तत्समयी आले भ्रतार । उघडा त्वरे कपाटासी ॥४९॥ मया क्रोधे मौन्य धरिले । त्याने बहुत मज विनविले । क्रोधे तुकार मज बोलले । म्या ताडन केले कुशब्द ॥५०॥ अर्गळा घेवोनि स्वकरि । कपाट उघडोनि हस्त मारि । कांत गेला पळोनि दूरि । धरिले तस्करी मज बापा ॥५१॥ आळिकार घेतले काढोन । भिल्लासि केले समर्पण । स्वरूप लावण्य देखोन । शीलखंडन करू पाहे ॥५२॥ नेक उपसर्ग करिता । म्या स्मरिलि कुळदेवता । मूर्छना आलि त्या त्वरिता । म्हणे तू माता क्षमा करी ॥५३॥ त्याने विकिले वाणियासी । विव्हळ जाला पाहे मजसी । म्या स्मरिले कुळदेवतेसी । उपसर्गासि निवारिले ॥५४॥
Jain Education International
For Private & Personal Use Only
www.jainelibrary.org