________________
प्रसंग तेहतीसावा
श्री वीतरागाय नमः
नत्वा श्रीजिनं जगत्पूज्यं आद्यब्रह्माणमद्भुतं | ब्रह्मेति देवपुत्रोऽसौ वक्षेहं लौकिकीं कथां ॥ १॥ मध्यलोकि मिथ्यातमति । अल्पज्ञानी विप्र म्हणती । इंद्रपद घेउ तप करीती । वनात जाती ऊर्ध्वबाहु ||२|| कंदमुळाचा तो आहार । ऋषिपत्नी ते बरोबर | पुत्रपुत्री लहान थोर । करिति संसार वनवासि ||३|| वनि करिति तप तीव्र । उभे एकट पदावर । उपवासी निराहार । औटसहस्र महातप ॥ ४ ॥ पवनयोग तप केले । इंद्रासन कंपित जाले । तपस्वी ब्रह्माना वोळखिले । पाठविले तिलोत्तमेसी ॥५॥ सप्तस्वर गंधर्व गायन | शृंगार-स्वरूप – लावण्य । तया समीप ते येवोन । पाहाताचि मदन भ्रष्ट जाला ॥६॥ श्रवन करिताची गायन । ब्रह्मा जाला तपचळन । पाहत से दीर्घनयन | कामबाण व्याकुळ जाला ॥७॥
Jain Education International
For Private & Personal Use Only
www.jainelibrary.org