________________
४३४ । आराधना कथाकोष
लिंगासि जिती शक्तीवान । पाहाता न दिसे त्रिभुवन । महारुद्र लिंगपतन । ते लिंग कोन पत्करील ।।१५८॥ तुम्ही सांभाळावे हे आता । हे तुम्हासीच आहे योग्यता । बहुत काय सांगु वार्ता । यासि साक्षता अंतरि तू ।।१५९।। ऐसि विष्णु वदे वचनी । पार्वती समजलि अंतःकर्णी । म्हण हे अशुभकरनी । निंदनिक जनी विष्णुदेवा ॥१६०॥ हरि म्हणे ऐकावे माये । याचा करीन मी उपाये । पूजनीक सर्वासि होय । कलयुगि समुदाए पुजिती ॥१६१॥ तथास्तु म्हणे पार्वती । हरहर सर्व म्हनती। समुदाए अरन्यात जाति । प्रेत पाहति ते रुद्राचे ॥१६२॥ पृथ्वी प्रळयलिंग आले । ते सर्वही देखते जाले । भयभीत अवघे पळाले । शांत केले ते पार्वतीन ।।१६३॥ विष्णु म्हणे चला समग्र । पूजाविधि घ्यावि त्वर । तेथे स्थापोनि प्रेतरुद्र । भस्माकार विभूतां आंगी ।।१६४॥ धतुरपुष्प बेलपत्र । स्मशानभूमी तप अघोर । त्रिशूळ संखडौरचक्र । शैवहरहरमहादेव ।।१६५।। अहोहो हे मिथ्यासर्वही । म्हणति प्रेता विटाळ नाहि । स्त्रियाआदि सर्वकाहि । भसग्राहि सर्व शुद्ध ।।१६६॥ त्याचि नाहि आत्मप्रचित । कळयुगि पाप अद्भुत । खोटा काळ तो साह्येयात । पंचमकाळात विस्तार ॥१६७॥ असो हा मिथ्यातविस्तार । वणिता ग्रंथ होईल थोर । समक्त्वी श्रोता ज्ञानाकार । परीक्षा अंतर करतील ।।१६८।। कुदेव कुगुरू कुशास्त्र । कुज्ञान कुबुधी कुमंत्र । कुपुण्य कुकुळि कुपुत्र । सुज्ञान सूत्र सम्यक्ती श्रोता ॥१६९।।
www.jainelibrary.org
For Private & Personal Use Only
Jain Education International