________________
प्रसंग सतावीसावा : ३६९ तत् पुरोहीत श्रीभूती । वेदाध्ययन अहंमती । ज्ञानाभिमानी धूर्तमति । अहं सत्यार्थी महिमोक्त ॥९॥ ऐसा तो नृप राज्य करित । धर्मध्यानी काळकर्मीत । गुरूमुखे शास्त्रयुक्त । कीर्ति जगात दयाधर्म ॥१०॥ तदा कवणे देशांतरी । पद्मखंडपुरनगरि । समुद्राख्य श्रावकाघरी । सति सुंदरी सीलवति ॥११॥ तत् पुत्र समुद्रदत्त । त्या सौख्य संतत संपत । एक दिने व्यापारकृत्य । आला फिरत सिंहपुरा ॥१२।। जवळ होति पंचरत्न । पुढे मार्ग आहे कठीन । श्रीभूति सत्यार्थी प्रधान । होतील जतन त्यापासी ॥१३॥ रत्न दिली प्रधानहस्ता । कोन्हासि मात न कळता । आपण चालला त्वरिता । समुद्रातौत्तारन्नदिया ॥१४॥ तेथे करोनि व्यापार । द्रव्य मेळविले अपार । झाजि बैसोनिया सत्वर । चालीले समग्र सिंहपुरा ॥१५॥ काऊर सुटले अद्भुत । झाज बुडाले समुद्रात । समुदाए कर्म सर्वा मृत्य । कपट मनात तयाचे ॥१६॥ समुद्रदत्त सावकार । नेमिक धार्मिक तत्पर । संध्या करिता बेटावर । गेले समग्र टाकोनिया त्या ॥१७॥ अहो ज्याचे कपट मनी । तो जाय नर्क भुवनि । राज्याभिळासे करोनी । कौरवा हानि सोमवंसी ॥१८॥ राज्यलोभ तो नारायण । समग्र यादव मिळोन । समुदाए कर्म उत्पन्न । गेले मरोन हरिवंसी ॥१९॥ ऐसे नेनो कित्येक नर । सत्यार्थीसी गांजिती फार । ज्याच कुड त्याचेच म्होर । काज झाज सन बुडाले ॥२०॥
Jain Education International
For Private & Personal Use Only
www.jainelibrary.org