________________
प्रसंग सव्वीसावा : ३५३ तदा श्रेष्टि कुमरासी । नेवोनिया स्वगृहासी। नानापरि सिकवि त्यासि । परंतु न धरि मानसि अनुमात्र ॥३१॥ म्हने मी सुटलो नृपापासुनि । मग कवनाचे भय न मानी। फार उद्धत होउनि । करिति निसदिनि चौर्यकर्म ॥३२॥ पुन्हा धरोनि पापकमि । तराले नेला राजभुवनि । महत्ताडन करोनि । दृढबंधनि बांधिला ॥३३॥ दंशमशक महासीत । पीडा होतसे अत्यंत । दुःख न मनि क्वचित । यथा पाउसात गज ॥३४।। या नरकि नाकिकासि । पीडा भोगिति दिवानिसि । कितिक दिवसा सोडिले त्यासी।प्राणसंकटासी प्राप्त करुणि ॥३५॥ मग शरीरबल पावोनि थोर । चोरी करिति निरंतर । पुन्हा धरोनि नृप किंकर । नेला सत्वर नृपमंदिरि ॥३६।। तदा नृपाज्ञा करोन । महान् करोनि ताडनबंधन । मग रासभि' बैसउन । देशातुनि काढोनि दिला । ३७॥ अहो पापीजन या भवि । दुःख भोगिति नवनवि । तद्वर्णन करील कोन कवि । येकिया जिह्वी जानिजे ॥३८॥ अहो कोशल देशांतरि । अयोध्याचे वनांतरि । पर्वतामाजि असे दरि । जावोनि त्याभीतरि राहिला ॥३९॥ नग्रामाजि जावोनि निसि । चोरी करिति दिवस दिवसि । नेवोनि स्वर्णरुप्प रासी । गुंफांतरि द्रव्यासी ठेविति ॥४०॥ ऐसे करिता सदोदित । द्रव्य संचिले अगणित ।। तरी मन नव्हे शांत । यथा मृत्तिकात घूस उकरि ॥४१॥
३. गर्दभ, ४. गुफा.
Jain Education International
For Private & Personal Use Only
www.jainelibrary.org