________________
३३० : आराधना कथाकोष भ्रतारासि वदे पन । उदयिक यासी न मारिन । तरि देईन निजप्राण । स्वामी सत्य मान मवैखरि'७ ॥५१॥ तदा आनोनि समलखार । पीष्ट करोनिया सत्वर । मैद्यात मिल्वोनि घृतसाकर । मोदक सुंदर केले तदा ॥५२।। मग द्वितिय दिवसि । वदति झाली कन्यकेसि । बाइ मी जाते धुने धुयासि । उसीर मजसि लागल ॥५३॥ गर्भगृहाचे सीक्यावरि । मोदक असति द्विप्रकारी । शुभ्र आणि श्याम शर्करि । न्यारि न्यारि असति ठेविले ॥५४॥ उज्वल निज स्वामिकारणे । भक्तिभाव फरालासि देने । शाम पित्यास परोसने । न होय जेन्हे ममापवाद ॥५५।। ऐसे वदोनि गेली जननी । विषया विचारिति मनि । पित्यासम दाता नसे जनि । करिति बोळवनि वस्त्रभूषने ॥५६॥ जे कपटि असे जाया'८ । ते धवावरि'९ करे फार माया । गोड गोड घालिति जेवाया। देर भासरिया घालि भाकरि ॥५७।। ऐसा विचार करोनि चित्ति । थोर धरोनिया प्रीति । उज्वल वादिले पित्याप्रति । शाम पतीताटि वाढिले ॥५८॥ लाडू भक्षिता श्रेष्टि श्रीदत्त । विषाग्नि पेटला हृदयात । तेन्हे जाळिले श्रीदत्तात । तत् क्षणि अंतकाल पावला ।।५९॥ ऐसी ऐकोनिया मात । विशाखा नारी आली धावत । थोर करिति आकांत । हृदय मस्तकात पीटिति ॥६०।। म्हने आता काय करू देवा । कैसा उद्भवला पाप ठेवा । संताप केला माझिय जीवा । करू प्रस्तावा कवनापुढे ॥६१॥
१७. वाक्य, १८. स्त्रिया, १९. भ्रतारावर.
Jain Education International
For Private & Personal Use Only
www.jainelibrary.org