________________
२६४ : आराधना - कथाकोष
जे जे उपसर्ग साहिले । केवळज्ञान प्राप्त जाले लौकांतिक देव आले । सिंहासन केले पूजन ॥ १८९ ॥
पुष्पवृष्टी दुंदुभी नाद | सूर वदती जै जै शब्द । ऐसा पाहोनी आनंद | गामवृंद सर्वहि आले ॥१९०॥ व्यंतरीचा वैर फिटला । दासि पंडिताचा भाव जडला | मनोरमादि स्त्रियांचा मेळा | श्रावकी सकळा नरनारी ॥१९१॥ मनोरमा अर्जिका जाली । कित्येकांनी दीक्षा घेतली । मोक्षाची वाट पाहियली । पूजा केली देव गेले ॥१९२॥ सुदर्शना केवळज्ञान | भव्यजीवा उपदेशून । शुक्ल पंचमी निर्वाण । मोक्षस्त्रीयेन माळ गळा ॥१९३॥ ऐसा श्रेष्ठ नौकारमंत्र । गुरूमुखे घ्यावा पवित्र । हृदयी जपा दिनरात्र | मंत्रे पवित्र सर्वकाही || १९४ || श्लोक । यथा भूमि परं नाल्पं न महत्गगनात्परं । तथा पंचनमस्कारं मंत्रात्मंतो न विद्यते ॥ १९५ ॥ जैसा अणुरेणुसमान । अल्प नाही दुज जान । जेवि उंची असे गगन | थोरपन दुजे नाही || १९६ ||
1
इति आराधना कथा कोशे नौकारमंत्रफळ सुदर्शन श्रेष्ठी रत्नकीर्तिविरचिते प्रसंग २० ॥ शुभं भवतु ॥
Jain Education International
For Private & Personal Use Only
www.jainelibrary.org