________________
प्रसंग विसावा : २५५
प्रतिज्ञा करोनिया ऐसी । समस्त गेले वनक्रीडेसी । पाहोनिया मुनिरायासी । सोडिले वहनासी सर्वांनी ॥८॥ नीसही नीसही उच्चारोन । त्रीपरित्य प्रदक्षणा करोन । श्रीफळद्रव्य पुढे ठेवोन । पंचांग नमन गुरूराया ॥८२॥ धर्मवृद्धी आशीर्वचन । सर्वहि बैसले योग्यस्थान । धर्म ऐकति स्थिरमन । अमृतासमान मधुरगिरा ॥८३।। दर्शनादि ज्ञान भेद । क्षमादि दशलक्षण शुद्ध । श्रावकाचार विविध । शास्त्रभेद अनेकापरी ॥८४॥ सप्ततत्त्वज्ञानाभीक्षण । सागार अनागार भेद दोन । श्रवण करिता समस्त जन । वृषभदासा मन वैराग्य ॥८५॥ सुदर्शनासी बोलाविले । रायाचे वोसंगि घातले । सर्वा क्षमाळिंगन दिधले । दीक्षित झाले मुनिअग्रे ॥८६॥ जिनमति दीक्षा घेवोन । तीव्र तीब्र तप करोन । स्त्रीलिंग छेदोनिया जान । स्वर्गभुवन इंद्रपद प्राप्त ॥८७॥ वृषभकीर्ति मुनिराय । स्वाधीन केली पंचेद्रिय । त्रिगुप्ती मनवचनकाय । महान् धैर्य मासोपवासी ॥८८॥ अंतकाळी समाधिमरण । स्वर्गी इंद्र पद पावन । इंद्र इंद्राइनी मिळुन । सुख संपन्न भोगिताती ॥८९॥ मग तो राजा नगरलोक । ग्रामात आले सकळीक । कपिला ब्राह्मणी विरहदुःख । सुदर्शन सुख इच्छित ॥९०॥ सखिस म्हणे आगे बाई । सुदर्शन सेटीचे गृहा जाई । तुझ्या अंगी बहु चतुराई । कोन्ह्याहि उपाई आनावे ॥९१॥ जरी तू त्या घेवोनि येसी । तन्हीच जीवेन जीवेसी । सखि म्हणे सखि बाईसी । परपुरुषासी न ईच्छावे ॥१२॥
Jain Education International
For Private & Personal Use Only
www.jainelibrary.org