________________
प्रसंग पंधरावा
श्रीवीतरागानमः
श्री सर्वज्ञदेवगुरूसी । नमस्कार माते सारदेसी । ग्रंथ उत्पन्न करावयासि । त्रयरत्नासि मम विनय ॥१॥ श्रोते सज्ञान चतुर । सुबुधी सुज्ञान अंतर । कुसंग त्यागिति दूर । महाचतुर जिनधर्मी ॥२॥ यदथी ऐकावे कथांतर । वच्छदेस कौसंबि नगर । राजा धनपाळ सुंदर । पुत्रपौत्रपूर्व सुहरत ॥३॥ चतुर्वेद पुराणसर्व । शास्त्रज्ञे हृदयी नास्ति गर्व । तयाचा पुरोहित द्विजराव । शिवभूति नाव तयाचे ॥४॥ त्याच नगरी एक कलाल । पूर्णचंद्र नामे एक धनपाल । त्या स्त्री माणिभद्रा सकुमाळ । सुमित्रा बाळतंतूकन्या ॥५॥ विवाह माऊला कन्येचा । प्रधानमैत्र व्याक लालाचा । समुदाय मिळाला सा-यांचा । देव प्रतिष्ठेचा आरंभ ॥६॥ आमंत्रण सर्वासी दिधले । प्रधानासीही जेऊ सांगितले । तव प्रधान उत्तर दिधले । हे नव्हे चांगले मित्रराया ॥७॥ पूर्णचद्र म्हणोनि ओ सिवभूती । मम गृही बाम्हण पाक करीती। उत्तमान्न शिजविती । संका चित्ती त्वा न धरावि ॥८॥ भीडेस पडला प्रधान । गेला तेथे करू भोजन । पंगति बैसले सर्वजन । खांडदुग्ध प्रासन केले ॥९॥
Jain Education International
For Private & Personal Use Only
www.jainelibrary.org