________________
(४३)
पण माणसाला खरे व खोटे ओळखता आले पाहिजे. त्याशिवाय तरणोपाय नाही. हा खऱ्याखोट्याचा खेळ सर्व क्षेत्रात सदैव चालू असतो. नग्न झाले की खायला मिळते असा समज झाल्याबरोबर अनेक व्यक्ती नग्न होतील. परंतु ही नग्नता सापेक्ष आहे की निरपेक्ष हे श्रावकाला ओळखता आले पाहिजे. नाहीतर त्याची व त्याला मार्गदर्शन करणाऱ्यांची फसगत होईल. 'डोळसपणा ' हा सम्यक्त्वाचा प्राण आहे. पण हा साधा चर्मचक्षू नाही. हा प्रज्ञाचक्षु आहे. हा सामान्य डोळयापेक्षा फार सशक्त व तेजस्वी असतो. अशा असामान्य चक्षु बाळणारी रेवतीराणी चिरकाळ स्मरणात राहली.
५.१० जिनेंद्रभक्त
दुसऱ्याचे दोष झाकणे व दुसन्याचा गुणांची प्रशंसा ह्यासारखे दुष्कर काम नाही. जो माणूस असे काम करू शकतो तो अद्वितीय म्हटला पाहिजे, असे अद्वितीय व्यक्तिमत्व जिनेंद्रभक्ताचे आहे. पापाचा द्वेष करावा पापी पुरुषाचा नको. ही धर्माची अनंतकाळची शिकवण आहे. त्याशिवाय वाल्याचा वाल्मिकी होऊ शकत नाही. ज्याला आपण चांगला समजतो तो वाईट वागू शकेल. आपण ज्याला वाईट समजतो त्याच्यातही चांगुलपणा असू शकेल. अशा मान्यतेशिवाय तडतोडीची जागा शिल्लक राहत नाही. ह्या कथेचे ख्रिश्चन धर्मात प्रसिद्ध असलेल्या कथेशी साम्य आहे. चोराने रात्रौ नेलेले चांदीचे ताटवाटी मीच त्याला दिले असे म्हणणारा धर्मोपदेशक व क्षुल्लकाने चोरलेली रत्नप्रतिमा मीच गाला दिली म्हणणारा धर्मोपदेशक व क्षुल्लकाने चोरलेली रत्नप्रतिमा मीच त्याला दिली म्हणणारा जिनेंद्रभक्त ह्यात काय फरक आहे ? जिथे एखाद्या माणसाची सद्भावना कमी पडते ती आपल्या सद्भावनेने भरून काढावी त्याशिवाय माणुसकीची प्रस्थापना जगात होऊ शकत नाही. असे व्यक्तिमत्व धारण करणारा जिनेंद्रभक्त अनेक धार्मिक पुरुषांना नकळत मार्गदर्शन करू शकेल.
Jain Education International
For Private & Personal Use Only
www.jainelibrary.org