________________
१८० : आराधना - कथाकोष
मार्गप्रभावनांग थोर । त्याचा वदावा सविस्तार | जेन तरू हा संसारसागर । सुकृत अमार कर्त्यासि ॥ ८॥ मधुरगिरा करोनि वानि । सुरस वदे गौतममुनि । वज्रकुमार मार्ग स्थापोनि । कीर्ति मेदनि विस्तारलि || ९ || हस्तनागपूर महा रम्य । जेवि इंद्रपुरि अनुपम । तेथे शांतिनाथ जिनोत्तम । बल राजा नाम राज्य करि ॥ १०॥ पूर्वपुण्य असे ग्रथित । संतति संपत्ति यथास्थित । त्याचा गरुडाख्य पुरोहित । ज्ञानवंत षडशास्त्री ॥ ११ ॥ तयाचा सोमदत्त सत्पुत्र । सुंदरांग पुण्यपवित्र । व्याकरणादि सर्वशास्त्र । निपुन सर्वत्र ज्ञानकला ||१२|| एकदा आहिच्छेत्रपुरासि । गेला मातुलाचे गृहासि | भेटला सुभूतिशास्त्रिसि । संतोष मानसि जाहला ॥ १३॥ तेव्हा तो मातुलाकारन । म्हने दुर्मुख राज्यदर्शन । घ्यावे मम इच्छित मन । सांगाते येइन तुमचे || १४ || ज्ञानगर्व धरोनि चित्ति । सोमदत्तासि म्हनि सुभूति । सभाधीट ज्ञानयुक्ति । नसता तेथे नेइ ना मी ॥ १५ ॥ तदा तो आपनेचि स्वय । संधि पाहून चातुर्यं । सभेसि जावोनि देखिला राय । पुण्योदय राजभेटी ॥ १६ ॥ सुंदर गिरा करोनि रसना । शास्त्रोक्त बोले आशिर्वचन । नृपकणि अमृतासमान । ऐकता रायान संतोषिला ॥ १७ ॥ बहुमान पंडिता आदर । करोनिया राज्यधर । मग बैसोनिया सादर । नानाशास्त्र ज्ञानचर्चा ॥ १८ ॥ व्याकरणादि अमरकोश | छेपन भाषाचा प्रकाश । केवळ बृहस्पतिचा अंश । ऐनि संतोष नृपांतरि ॥१९॥
Jain Education International
For Private & Personal Use Only
www.jainelibrary.org