________________
प्रसंग अकरावा अथ सुस्थितिकरण वारिसेन कथा
जो छेतालिस गुणमंडित । तोचि जानावा देव अहंत । नित्य नमु तत्पंकजात । सिद्धि व्हाव्यात कथारंभ ।।१॥ जिनमुखोत्पन्न जे भारती । तत्पदकमली मम नुती । जे भक्ताचे अज्ञान हरती । सुज्ञान देती ग्रंथारंभी ॥२॥ सद्गुरूसंसृतिवाद्धितारक । ज्यासी वंदिती तीन लोक । तत्पद वंदु भवहारक । ज्ञानदायक सेवकासी ॥३॥ सुस्थितिकरणां याचि कथा । सभाजन व्हावे ऐकता । जेन्हे कर्माची होय शांतता । ते स्वस्थचित्ता आइकिजे ॥४॥ भरतक्षेत्रामाजि सार । मगध देश मनोहर । केवळ धर्माचा आगर । तद्वर्णन कोठवर करावे ।।५।। त्यामाजी राजगृह नगरी । शोभे जैसी इंद्रपुरी । वनोपवने शोभा भारी । पाहता नेत्री तृप्त नव्हे ॥६॥ त्या नगरीचा जगपालक । जिनमार्गी असे श्रेणिक । ज्यासी मानिती जनलोक । सम्यक्त्वपालक शिरोमणि ॥७॥ तयाची राज्ञी असे चेलना । स्वरूपे सुंदर चंद्रवदना । सप्तशीलाची असे सीमा । प्रीति जिनधर्मावरि असे ||८|| हृदी सम्यग्रत्नभूषित । कीर्ति विस्तारिलि जनात । सदाचरि श्रावकव्रत । पुण्यसंचित नित्यप्रति ।।९।।
Jain Education International
For Private & Personal Use Only
www.jainelibrary.org