________________
प्रसंग दहावा
प्रथम नमु श्रीजिनराय । ज्याचेनि मोक्ष प्राप्त होय । पाप पळोनिया जाय । श्री जिनराय वंदिताचि ॥१॥ माय माझि श्रीजिनवानि । वंदू जोडोनि द्वयपानि । कवित्वकला मजलागुनि | कृपा करोनि देइ माते ||२|| सद्गुरु स्वामी दयावंत । ज्ञानदाता जडमूढात । तत्पदि पंचांग नमोस्त । कथाकर्तृत्व ज्ञानदाता ||३|| श्रोते भाविक भव्यजन | कथेसि लावोनिया मन । सोपगूहनांगपालन | जिनेंद्रभक्तान प्रकासिले ||४|| ते कथा महारसाळ | दया मार्दवशांतिस्थळ | जे करितिल प्रतिपाळ । ते दयाळ पुण्यवंत ॥५॥ T जंबूदिपात भरतक्षेत्र । त्यात सोरट देश पवित्र । जेथे जन्मले तीर्थंकर यादवेंद्र नेमिनाथ ||६|| I त्या देशात पाडलिपूर । तेथे यशोध्वज नृपवर । राज्ञी सुसीमा मनोहर । रूपसुंदर शीलवंति ॥७॥ सुवीराख्य पुत्र तयाचा । असे परि अवगुणाचा । छंद सप्तव्यसनाचा । तस्काराचा सिरोमणि ॥ ८ ॥ पाहोनिया त्याची करनी । माता पिता दुःखिस्त मनि । बुद्ध सिकविता न मानि । कुलि जन्मोनि कुपुत्र ||९||
Jain Education International
For Private & Personal Use Only
www.jainelibrary.org