________________
३.४
३.५
३.६
(४)
ज्या संस्कृत ग्रंथावरून त्यांनी हा ग्रंथ रचला ती ब्रह्म नेमिदत्ताची (अपूर्ण) कृति अपूर्ण स्वरूपात सापडली आहे. आराधना कथाकोश हे त्या पोथीवर दिलेले नाव आहे. पृष्ठ क्रमांक ५२ पासून ती उपलब्ध आहे. शेवटच्या पृष्ठाचा क्रमांक १७७ आहे. मध्ये काही पृष्ठे गहाळ आहेत. पुष्पिका खालीलप्रमाणे आहे.
' इति श्री कथाकोशे श्री भट्टारक मल्यभूषण शिष्ये ब्रह्म नेमिदत्तविरचिते श्रीजिनपादपूजाफलदृष्टान्तवर्णनायां चतुर्थ परिच्छेद : " सं. १८४८ वर्षे आसोज शुक्ल तिथौ २ गुरुवासरे लिखायतं आचार्य श्री माणिक्यनंदजी लिखितं व्यास म्हजरामेण तक्षेतपुरमध्ये लिखितं ।
त्यातच पुढे आचार्य श्री १०५ श्री रत्नकीर्तिजी स्वपठनार्थ मिती जेष्ठ कृष्ण ४ सं. १८८१ का कामालपुरो सहर सुहावणी चंदविराजत देव श्रावकतो सुयस बसै नितिप्रति करें नितिसेव
चंद्रप्रभजिनं नत्वा, केवलज्ञानभास्करा । लोकालोकप्रकाशाय, स्वर्गमोक्षसुखप्रदं ॥ श्रीमत् पदं जिनं नत्वा चतुर्विंशतिसत्पुमान् । घातिकर्मक्षयोद्भूतं सद्नंतचतुष्टयान् ॥ लिखितं पंडित गिरिधारीलाल रूपनगरमध्ये आदिनाथचैत्यालये जिनागारे मंगलं भूयात् श्री जिनेंद्र जयति
"
ह्यावरून नेमिदत्त ब्रह्मचारी ह्यांनी संस्कृत भाषेत पद्यात लिहिलेला आराधना कथाकोश रत्नकीर्तिच्या संग्रही होता. त्यावर सं. १८८१ चा काळ आहे. बरोबर १५३ वर्षापूर्वीचा. त्याचवेळी हा मराठी पुण्यास्रव कथाकोश पूर्ण झाला. त्यापूर्वी मूळप्रत १३ वर्षापूर्वी लिहिल्या गेली असे दिसते.
कामालपुरा शहर किंवा रूपनगर कुठे आहे हे पाहावे लागेल. पण ते उत्तर हिंदुस्थानात असले पाहिजे असे दिसते.
Jain Education International
For Private & Personal Use Only
www.jainelibrary.org