________________
Shri Mahavir Jain Aradhana Kendra
८२
www.kobatirth.org
लेखांक २०५ - हरिवंश पुराण
भट्टारक संप्रदाय
त्याचे अंशी ज्ञानराशी । गुणकीर्ति सागर ।। २६९ त्याचा शिष्य क्षमाशील । जो चंद्रकीर्ति विशाळ || त्याचे मम माथा करकमळ । गुरु दयाळ तो माझा || २७० त्याचे अंशी महारत्न | मानिकनंदी निग्रंथ पूर्ण | त्याचा सजन जनार्दन । श्रावक जैन गृहाश्रमी || २७१ शके सोळाशे सत्याण्णव | वद्य पक्ष माघ अपूर्व ॥ सप्तमी वार शनि राव । तिसरा याम जाण पा । २७८
Acharya Shri Kailassagarsuri Gyanmandir
लेखांक २०६ - आदितवार कथा
[२०४ -
[ अध्याय ४०, च. १९०४ ]
अजितकीर्ति
गुरु अन्वय झाले भट्टारक | मुनि देवेंद्रकीर्ति सुरेख || त्याचे पट्टी जाले भट्टारक । कुमुदचंद्र || ५५ कुमुदचंद्राचे पटधारी । धर्मचंद्र झाले बागेस्वरी || तयाचे पट्टी उद्योतकारी । जाहाले गुरु || ५६ गुरु जाले हो धर्मभूषण । तयाची आम्नाय विचक्षण || भट्टारक विशालकीर्ति जाण । गुरु आमुचे ।। ५७ तयाचे पटी हो ज्ञानजोती । भट्टारक श्रीअजितकीर्ती ॥ माउली आमुची पुण्यमूर्ती । ते व्हावी आम्हा ।। ५८ तयाचा शिष्य जो ब्रह्मचारी | पुण्यसागर कवित्व करी ॥ महाष्ट भाषा टीका उच्चारी | हरिवंश कथा ॥ ५९
For Private And Personal Use Only
( ना. १ )
श्रीमूलसंघ वागेश्वरी गछ । बलात्कार गण जाणिजे प्रत्यक्ष || गुरु अजितकीर्तीने केली साक्ष | श्रवणमात्रे ।। १७९ सिक्ष विनति करितो तुम्हा | कवि बोले पुण्य ब्रह्मा || स्वामी कृपा करावी आम्हा | जन्मोजन्मी || १८०
[ना. १६]