________________
स्व रेवचंद तुळजाराम गाह निपाणी याच्या प्रयत्नाने थी दक्षिण महाराष्ट्र जैन श्वे प्रातिक परिषदेची स्थापना व पहिले अधिवेशन ११, १२, १३, जून १९२१ या दिवशी येथेच झाले. त्याचे अध्यक्षस्थान स्व प फत्तेचद कर्परचद लालन यानी भूपविले होते या अधिवेशनाला जोडूनच महिला परिषद झाली सागली येथे सन १९१५ मध्ये स्थापन झालेले श्री जैन श्वेतावर विद्यार्थी वसतिगृह पुढे या परिषदेकडे सोपविण्यात आले या परिपदेचे एक अधिवेशन १९२८ साली श्री कुभोजगिरी तीर्थावर काशीचे यतिश्री हिराचदजी महाराज याच्या अध्यक्षतेखाली झाले होते एकसवा येथे एक पचाचा वाडा आहे
३ कणंगले (ता. हुकेरी) पुणे बगलोर हमरस्त्यावर श्री स्तवनिधी डोगराच्या पायथ्यास रस्त्यालगत असलेल्या ५ हजार वस्तीच्या या गावात श्रावकश्राविकाची सख्या ४० आहे श्री दिपचद वापूचद शाह याचे स २००२ मध्ये स्थापन झालेले गृहमदिर असून थी मुविधीनाथ प्रभूची धातूची प्रतिमा तेथे आहे
४ रवानापूर (जि. बेळगाव) पुणे वगलोर हमरस्त्यावर निपाणीपासून वेळगावकडे २१ मैलावर असलेल्या या गावात श्रावकाची घरे पाच आहेत परतु सर्वजण धर्मपरायण असून धार्मिक उत्सव होतात आणि तपाराधानात नेहमीच ते सहभागी होतात पू । पा आ विजयरामचद्र सूरीश्वरजी महाराज आपला हुबळी येथील गतुर्मास पुरा करून सवत १९९७ ला कोल्हापूराकडे जाताना त्यानी आपले नूतन शिष्य पू महाप्रभ दि वडी दीक्षा येथेच दिली येथील दोसी जिवराज मगनचद याच्या कुटुंबातील कु आक्काताई
आणि कु इदुवाई यानी स २०१३ मध्ये सवेगी दीक्षा घेतली आहे येथील एकूण एक श्रावक श्राविकानी अठ्ठाई, सोळा उपवास वर्धमान तप अशा तपतपश्चर्या केलेल्या आहेत, करीत आहेत प्रत्येक घर धार्मिक आचार विचाराची शाळा बनलेले आहे __ येथे श्री नमिनाथ भगवताची प्रतिमा असलेले एक गृहमदिर आहे
काही वर्षापूर्वी येथील मदिरातील जिनमूर्तीची चोरी झाली तेव्हा ती मर्ती मिळेपर्यत घरोघरी आयविलतप सुरू झाले एक वर्षाने त्या मूर्ती मिळाल्या तप, श्रद्धा व उच्च भावनेचा हा साक्षात्कार होय. __५ गोकाक (ता. गोकाक) सदर्न सेट्रल रेल्वेच्या गोकाक स्टेशनपासून अगर पुणे बगलोर रस्त्यावरील सकेश्वर पासून गोकाक येथे जाता येते घटप्रभा नदीच्या तीरावर गोकाक असून नदीचा धवधवा व झुलता पूल पहाण्यासारखा आहे तेथे एक सुताची गिरणी आहे बत्तीस हजार लोकवस्तीच्या या गावात श्रावकाची सख्या २५१ आहे येथे सवत २०११ वर्षी गृहमदीर स्थापन झाले पुढे स २०२२ या वर्षी पू प रजन वि गणिवर्य आदीच्या निश्रेत प्रतिष्ठा महोत्सव झाला मूळ नायक श्री नेमिनाथ भगवान व त्याच्या उजव्या वाजूस ऋपभदेव भगवान आणि डाव्या बाजूस श्री महावीर स्वामि याच्या प्रतिमा विराजमान आहेत एक उपाश्रय आहे स २०२४ पासून पाठशाळा सुरू झाली असून एकतीस विद्यार्थी धार्मिक पाठ घेतात थावकजनाचा व्यवसाय सराफी, मूत, भसार इत्यादीचा व्यापार आहे
६ चिकोडी (ता. चिकोडी ) लोकसख्या अठरा हजार श्रावकांच्या १२ कुटुबात ७०
भी कुभोजगिरी शतादि महोत्सव ]
[ २६५