________________
अन्मति-तीर्थ अनार्य श्रमण मिथ्या क्रियाकांडात अडकतो. संसारसागरातून पार होण्याऐवजी संसारातच डुबतो. भगवंत म्हणतात -
हे साधका ! पाच समितीचे पालन कर. तीन गुप्तींचे रक्षण कर. सर्व पदार्थाची आसक्ती सोडून करीत असलेल्या क्रियाकांडाचा विचार कर. ज्ञान, दर्शन, चारित्र्याचा आराधक होऊन ग्रहण केलेल्या संयमात सम्यक्प्रकारे प्रवृत्ती कर आणि पुरुषार्थाने कर्मबंधनाचे पाश तोडून सिद्धश्रीची माळा धारण कर.
मन्मति-तीर्थ (६) आदानीय अध्ययन
- आशा कांकरिया त्रायिन् , त्रिकालविद् , तिन्नं आणि तारयाणं, हे तर घाती कर्मांचा क्षय करणाऱ्या, अरिहंतांचे विशेषण ।।
चित्त विप्लुतीच्याही पलिकडले, असे आहे ज्यांचे केवलज्ञान, अनुभूत सिद्ध अनुपम तत्त्वांचे,
करतात जे आख्यान ।। सत्याने संपन्न, यथार्थ अशा, ज्ञानाचे होते प्रकटीकरण, अध्यात्म व आत्ममयता, हेच त्याचे खरे कारण ।।
इथे तिथे कुठेही भेटणार नाहीत असे महान उदाहरण, म्हणून तर त्यांचे,
करायलाच हवे अनुसरण ।। सर्व भूतमात्रांशी मैत्रीभावना, हा तर ऋषींचा धर्म, या जीवित भावनेतच, दडले आहे सत्य (मैत्री) धर्माचे मर्म ।।